सिल्लोड तालुक्यातील ४ हॉटेलमध्ये पुरवठा विभागाने टाकला छापा, गुन्हा दाखल
सिल्लोड, (प्रतिनिधी) शहरात दोन हॉटेल व एका हॉटेल व बियरबार वर आशा तीन ठिकाणी व भराडीतील एका हॉटेलमध्ये सिल्लोड येथील पुरवठा विभागाच्या पथकाने छापा मारून हॉटेल मध्ये घरगुती गॅसचा वापर करणाऱ्या हॉटेल मधून ४ घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले. ही कार्यवाही सोमवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आले.
सिल्लोड तहसीलदार संजय देवराये यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार बळीराम मुंडे, पुरवठा
निरीक्षक आशिष औटी, कनिष्ठ लिपिक सौरभ सोनवलकर यांनी शहरातील पांडुरंग दुधे यांच्या हॉटेल राधिका बियरबार व परमिट रूममध्ये त्यानंतर रामेश्वर भोकरे यांचे बायपास रोडवर असलेल्या हॉटेल राधिका रेस्टॉरंट, आंबेडकर चौकातील दिलीप अग्रवाल यांचे समाधान हॉटेलमध्ये व भराडी येथील संतोष अग्रवाल यांचे ओमसाई रेस्टॉरंटमध्ये छापा मारला.
या हॉटेलमध्ये स्वयंपाक किचनमध्ये कमर्शियल गॅस सिलेंडर ऐवजी घरघुती गॅस सिलेंडर स्वयंपाक करताना वापरले जात आल्याचे लक्षात आल्यावर महसूल गुन्हे दाखल होणार. पथकाने हॉटेल चालकांना रंगेहाथ पकडले. प्रत्येकी हॉटेलमधून एक सिलेंडर असे एकूण चार हॉटेल मधून चार घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले. यामुळे हॉटेल व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकात घबराट पसरली आहे.
या ४ हॉटेल चालकांनी हॉटेलमध्ये कमर्शियल गॅस ऐवजी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मनाई असताना विना परवाना घरघुती गॅस सिलेंडरचा वापर केला आहे. हा कायद्याने गुन्हा आहे. यामुळे सद्या त्यांचे गॅस सिलेंडर पंचनामा करून जप्त करण्यात आले आहे. वरिष्ठांच्या आदेशाने संबंधित लोकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहे. यामुळे कुणी व्यावसायिकांनी घरगुती गॅसचा वापर व्यक्सायासाठी करून गॅसची टंचाई निर्माण करू नये, नसता त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.
- बळीराम मुंढे,
नायब तहसीलदार पुरवठा, सिल्लोड













